। नेरळ । वार्ताहर ।
माता रमाबाई आंबेडकर यांची 126 वी जयंती डिकसळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात साजरी करण्यात आली. रमाबाई महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाबाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हिराबाई हिरे, सुजाता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजा करण्यात आली. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर रमाबाई महिला मंडळाच्या वतीने महिलांचे कार्यक्रम आयोजित केले होते.
रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांची संगीत खुर्ची, कपाळाला टिकली लावणे असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धांमध्ये महिला मंडळाच्या महिला आणि गावातील महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा गायकवाड, मोनिका गायकवाड, कल्पना हिरे, पूर्वा गायकवाड, तुष्णा गायकवाड, शोभा चव्हाण, कमल ब्राह्मणे, मंगल वाघ, रेखा जाधव यांनी पुढाकार घेतला.