केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

सीतारामण यांना सोमवारी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Exit mobile version