धुतुममधील विकासकामांचे केंद्रीय पथकाद्वारे पाहणी

। उरण । वार्ताहर ।
धुतुम ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांचे केंद्रीय पथकाद्वारे पाहणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे प्रतिनिधी जुनेद उस्मानी व सुचिता देव यांच्या सोबत कचरे युनिसेफ प्रतिनिधी मुंबई तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता तज्ञ जयवंत गायकवाड, जिल्हा आयइसी तज्ञ सुरेश पाटील, उरण पंचायत समिती बीडीओ नीलम गाडे, अंजने, अनिल नारांगिकर, पालव तसेच इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
या वेळी कमिटीने गावाच्या सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी केली. बंदिस्त गटर व योग्य नियोजन तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी आणि माहीती घेतली. धुतूम गावाच्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कमिटी दिल्लीवरून आल्याने सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version