| वावोशी | प्रतिनिधी |
आधार कार्ड नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव असलेल्या कातकरी समाजातील नागरिकांना शासनाकडून आवश्यक दाखले देण्यात आले. हा महत्त्वपूर्ण उपक्रम 3 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालय, खालापूर येथे पार पडला. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या पुढाकाराने व निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या उपस्थितीत उंबरे व साजगाव येथील एकूण 17 लाभार्थ्यांना वय व आदिवासी दाखले वाटप करण्यात आले. या कामात आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते दिलीप डाके यांनी महत्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक आदिवासी नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून नागरिकांनी तहसील प्रशासनाचे आभार मानले आहेत.







