मुरूड तालुक्यात दाखले वाटप शिबीर

। आगरदांडा । वार्ताहर ।
महाराजस्व अभियानांतर्गत मुरुड तहसील कार्यालयामार्फत 2022-2023 या शैक्षणिक वर्षात सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरिता आवश्यक असणार्‍या विविध स्वरुपाचे दाखले व प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स या मध्यवर्ती ठिकाणी विशेष शिबिर आयोजन सकाळी 10ते सायं 4 वाजेपर्यत करण्यात आले आहे.

या शिबिरात नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुरुड तहसीलदार -रोहन शिंदे यांनी केले ालुक्यातील नागरिकांना त्यांच्याशी संबंधित दाखले मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबीराच्या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार आहे.

Exit mobile version