| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांचा चैत्र पालखी सोहळा शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी साजरा होत आहे. ग्रामदेवतांची पालखी लवकरात लवकर व नियोजित वेळेत मंदिरात परतण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन जोगेश्वरी माता मंदिरात गुढीपाडवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भातील बैठकीत जोगेश्वरी माता उत्सव समितीकडून करण्यात आले.
या बैठकीला देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र, सचिव भाई टके, हरेष काळे, विलास चौलकर, उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, मंगेश कामथे, संजय नांगरे, खजिनदार प्रथमेश काळे, सहखजिनदार सुदर्शन कोटकर, देवीचे भक्त मधुकर पोवळे, नारायण तेलंगे, आप्पा रावकर, तिरत पोलसानी, विजय नागोठणेकर, अनिल नागोठणेकर, विनोद अंबाडे, बाळाराम पोटे, किरण लाड, राजा गुरव, राजेश पिंपळे, दिनेश घाग, अरुण गुरव आदींसह उत्सव समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित अनेकांनी यावेळी पालखी नियोजनाच्या चर्चेत सहभाग घेतला.