टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान

| इंग्लंड | वृत्तसंस्था |
टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. शेवटच्या दिवशी सामना वाचवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. चौथ्या दिवशी 55 धावांत तीन विकेट्स पडल्यानंतर चेतेश्‍वर पुजारा (45) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) यांनी चिवट खेळी करत भारताचा डाव सावरला. परंतु, अखेरच्या सत्रात या दोघांसह रवींद्र जाडेजासुद्धा बाद झाल्याने भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी निर्णायक अवस्थेत आली आहे. आता ऋषभ पंत आणि तळाच्या फलंदाजांवर भारतीय संघांची मदार आहे.

भारताने दुसर्‍या डावात 6 बाद 181 धावा केल्या असून, 154 धावांची आघाडी आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता. टीम इंडियाकडून पहिल्या डावातील शतकवीर के.एल. राहुल केवळ पाच धावा करत बाद झाला, तर रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाला. भारतीय कर्णधार विराट कोहली देखील 20 धावांवर बाद झाल्यानं टीम इंडिया अडचणीत सापडली. इंग्लंडकडून मार्क वूडने तीन तर मोईन अलीने दोन विकेट्स घेतल्या आहेत.

Exit mobile version