। इंग्लंड । वृत्तसंस्था ।
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. दरम्यान, टीम इंडियाची प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सामन्याच्या तिसर्या दिवशी भारताने आपल्या दुसर्या डावात दमदार फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी दोन्ही संघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, काही वेळापूर्वीच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना संघाच्या उर्वरित सदस्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवसाचा खेळ आपल्या प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत खेळत आहे.