श्री खंडेराय देवस्थानचा चंपाषष्ठी महोत्सव

| चणेरा | वार्ताहर |

रोहा येथिल श्री खंडेराय देवस्थान मंदिरात बुधवार दि. 13 डिसेंबरपासून गेली सहा दिवस चंपाषष्ठी महोत्सव भक्तिभावाने सुरू आहे. चंपाषष्ठी निमित्ताने श्री खंडेरायांचा पालखी उत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोहा शहरात श्री खंडेरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी गर्दी करून पालखीचे दर्शन घेतले.


मंदिरातील चंपाषष्ठीचा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होत असून हा उत्सव सहा दिवस चालतो. यावेळी मंदिरात भजन, किर्तन, व्याख्यान, पूजार्चन, लघुरुद्राभिषेक, तळीभंडार, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. सोमवारी पालखी मिरवणूक झाल्यानंतर आज मंगळवारी मंदिरात भंडारा महाप्रसादाच्या कार्यक्रमाने चंपाषष्ठी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

यावेळी मंदिरात श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खटावकर, मल्हार भांड, संभाजी लाळगे, अमेय भादेकर, हेमंत शेवाळे, संजय कवितके, सचिन कुरकुंडे, राहुल गुंड, मिलिंद रायकर, मार्तंड भांड, रविंद्र शेवाळे, सुनिल भादेकर, राजेश विरकर, समीर गोरे, संभाजी लाळगे, संतोष भादेकर, अमेय भादेकर उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मल्हार भांड, दिलीप शेवाळे, किशोर मधुकर पाडसे, चंद्रशेखर गुंड, संजिव कवितके, शिरीष गुंड, सदानंद भांड आदींसह उत्सव समितीचे सदस्य आणि महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version