स्वराज दळवीला चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचे पारितोषिक

। नागोठणे । वार्ताहर ।
महाराष्ट्र अबॅकस असोसिएशन तर्फे नागपूर येथून संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत स्वराज महेश दळवी याने लेवल चारमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचे पारितोषिक मिळविले आहे. अबॅकस असोसिएशनचे उमेश महाजन (भुसावळ), शुभांगी हेडाऊ (नागपूर), प्रणिता दहिफळे (पालघर) आणि राजश्री बोलके (नागोठणे) या चौघांनी मिळून महाराष्ट्रातील ही अबॅकस संघटना स्थापन केली आहे. यापूर्वीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविलेला स्वराज दळवी हा येथील माऊंट लिटेरा झी स्कूलमधील इयत्ता 4 थी चा विद्यार्थी आहे. बुध्दीचा कस लागत असलेल्या व अत्यंत कठिण समजल्या जाणार्‍या या स्पर्थेत स्वराज दळवी याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version