चंद्रकांत ठाकूर यांचे निधन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागरी संरक्षण दलाचे माजी सल्लागार चंद्रकांत बामा ठाकूर (78) यांचे 4 जून रोजी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात निधन झाले. मूळ राहणार उरण तालुक्यातील धुतम गावचे त्यांचे कुटुंब होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच अभिनेते स्वर्गीय सुनिल दत्त यांचे ते निकटवर्ती मित्र होते. त्याचबरोबर आदर्श आगरी युवक मंडळाचे संस्थापकही होते. तीन दशक त्यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही काम केले. एवढेच नव्हे, तर अनेक वर्षे पोलीस मित्र म्हणून पोलिसांसोबतही त्यांनी काम केले. त्यांच्या कार्याचा दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही गौरविण्यात आले. गुणवंत कामगारासह त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी छाया ठाकुर, मुलगी तृप्ती ठाकुर, मुलगा विद्यासागर ठाकुर, सून मनिषा ठाकूर, नातू अवधूत ठाकूर असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version