महिला पोलिसांच्या कामाच्या तासात बदल

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महिला पोलीस कर्मचार्‍यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. येणार्‍या काळात महिला पोलीस कर्मचार्‍यांचे कामाचे तास 12 हून 8 तास करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचलक संजय पांडे यांनी यासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत.

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 8 तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्याचे पांडे यांनी आदेश दिले आहेत. यानंतर काही दिवसात अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी देखील असते.

यामुळे त्यांची बरीच दमछाक होते. यामुळे महिला कर्मचार्‍यांमध्ये आजारी पडण्याचे अन्य व्याधींनी ग्रास्त होण्याचे प्रमाण वाढते हे टाळण्यासाठी गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे त्याची 8 तास ड्युटी केल्यास महिला पोलीस कर्मचारी गैरहजर राहणे, आजारी पडणे हे प्रमाण कमी होईल, अशी धारणा यामागे आहे. मात्र सण उत्सव काळात महिला कर्मचार्‍यांच्या तासाबाबत वरिष्ठांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

Exit mobile version