| रेवदंडा | प्रतिनिधी |
श्रीवर्धन पाठोपाठ चरसच्या पिशव्या कोर्लई आणि थेरोंडा किनारी सापडल्या आहेत. यामध्ये 24 किलो 908 ग्रॅम वजनाचा चरस असून,बाजारात याची किंमत रूपये 99 लाख 63 लाख 200 रूपये असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांच्यावतीने देण्यात आली. रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी एकूण 11 पाकिटे सापडली आहेत.आतापर्यंत एकूण 118 पाकिटे सापडली असून 4.5 कोटी रूपयांचा मुुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे व उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे यांनी तातडीने सहकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी या ठिकाणी सापडून आलेल्या पाकिटावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरूडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्या बाजूला इंग्रजी मध्ये AF$G$AN PR>OD$UCT> असे लिहिलेले आहे. ही अक्षरे ऊर्दूमध्ये आहेत. एकूण नऊ प्लॉस्टीक पिशवीची पाकिटे व काही फाटलेल्या पाकिटामधून बाहेर येवून तुकडे पडून वाळू मध्ये पसरलेल्या हिरवट काळसर रंगाचा पदार्थ असा मौजे कोर्लई समुद्र किनारी 13 किलो 720 ग्रॅम वजनाचा अंदाजे रूपये 54 लाख 88 हजार रूपये किमंतीचा चरस नावाचा अंमली पदार्थ तसेच थेरोंडा समुद्र किनारी 11 किलो 188 ग्रॅम वजनाचा एकूण 44 लाख 75 हजार 200 रूपये किमंतीचा असा एकूण 24 किलो 908 ग्रॅम वजनाचा रूपये 99 लाख 63 लाख 200 रूपये किमंतीचा चरस नावाचा अमंली पदार्थ असलेला मुद्देमाल सापडला आहे.