मुंबई सेंट्रल स्थानकात स्वस्त्यात मस्त हॉटेल…असे करा बुकिंग

मुंबईमध्ये पहिले पॉड हॉटेल; भारतीय रेल्वेची अनोखी संकल्पना
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
भारतीय रेल्वेने बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर आपल्या पहिल्या पॉड हॉटेलचे अनावरण केले. वृत्तानुसार, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक पॉड संकल्पना कक्षाचे औपचारिक उद्घाटन केले. थकवणारा प्रवास केल्यानंतर आरामदायी मुक्काम शोधत असलेले ट्रेन प्रवासी या पॉड कॉन्सेप्ट रिटायरिंग रूममध्ये चेक-इन करू शकतात. या आधुनिक रिटायरिंग रूम तुलनेने स्वस्त दरात बुक केल्या जाऊ शकतात. पॉड हॉटेल्स किंवा कॅप्सूल हॉटेल्स प्रथम 1970 च्या उत्तरार्धात जपानच्या ओसाका येथे शहराच्या मध्यभागी स्थापन करण्यात आली.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आधुनिक रिटायरिंग सुविधा बांधण्यात आली आहे.

पॉड हॉटेल बुकिंगसाठी उपलब्ध श्रेणी–

  1. या अनोख्या रिटायरिंग सुविधेमध्ये एकूण 48 पॉड इन्व्हेंटरी आहेत, ज्यामध्ये 3 श्रेणींचा समावेश आहे, 30 क्लासिक पॉड्स, 7 महिला, 10 खासगी पॉड्स आणि एक अपंगांसाठी देखील आहे.
  2. क्लासिक पॉड्स आणि फक्त महिला पॉड्समध्ये एका पाहुण्याला आरामात बसता येईल, तर खासगी पॉड खोलीत एक खासगी जागा देखील असेल.
  3. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या पॉडमध्ये 2 पाहुण्यांना आरामात व्हीलचेअरच्या मोकळ्या हालचालीसाठी जागा मिळेल.

पॉड हॉटेल बुकिंगची किंमत

  1. मुंबई सेंट्रल येथील पॉड हॉटेल सर्व प्रवाशांसाठी 12 ते 24 तासांसाठी अनुक्रमे 999 रुपये आणि 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
  2. एक खासगी पॉड 12 ते 24 तासांसाठी अनुक्रमे 1,249 रुपये आणि 2,499 रुपयांमध्ये मिळू शकते.

पॉड हॉटेल कॅप्सूलची प्रमुख वैशिष्ट्ये
रात्रभर परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, पॉड हॉटेलमध्ये अनेक लहान बेड-आकाराच्या कॅप्सूल असतील.
प्रत्येक पॉड वापरकर्त्याला मोफत वाय-फाय, सामानाची खोली, प्रसाधनगृहे, शॉवर रूम्स, सामान्य भागात वॉशरूम उपलब्ध असतील. पॉडच्या आत, टीव्ही, एक छोटा लॉकर, आरसा, एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर व्हेंट्स, इंटीरियर लाइटशिवाय रीडिंग लाइट्स, मोबाइल चार्जिंग, स्मोक डिटेक्टर आणि ऊछऊ इंडिकेटर यासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

Exit mobile version