विक्रांत वार्डे यांचा आरोप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे विद्यमान आमदारांकडून तालुक्यातील बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुकाध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी असे म्हटले आहे की, आमदारांनी युवकांना रोजगारासाठी पत्र दिले असे कळले. पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष म्हणून माझी हिच विचारणा आहे की मागे सुद्धा रोजगाराच्या नावावर हजारो बायोडाटा घेतले गेले होते. त्याचं काहीच झालं नाही. मग आतासुद्धा तसच होणार का?असा सवालही वार्डेंनी उपस्थित केला आहे.
खरतर आरसीएफ कंपनी ही थळ ग्रामपंचायत हद्दीत येते, तसे असूनसुद्धा शेकाप आ. जयंत पाटील यांनी त्या काळात जी भरती करून घेतली त्यानंतर स्थानिकांची भरती राजकीय पातळीवर म्हणावी तशी झाली नाही.याकडेही वार्डेनी लक्ष वेधले आहे.
याउलट शेकापच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शाळा, बँक, रायगड बाजार अशा ठिकाणी नोकर्या वास्तविक लागल्या आहेत. नोकरीच्या बाबत फक्त पत्रव्यवहार न होता खरोखर काम झाले पाहिजे असे आम्हाला वाटते. अशी अपेक्षाही वार्डेंनी व्यक्त केली आहे.