बनावट नोटीद्वारे दुकानदाराची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

बनावटी नोटा वितरित करून एका दुकानदाराची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन पनवेलमध्ये जीवराज भाटी यांचे किराणा दुकान असून, त्यांच्या दुकानात एक इसम 100 रुपयाच्या तीन नोटा घेवून आला व त्याने जवळपास 265 रुपये किंमतीचा माल खरेदी केला व त्याच्या जवळील 100 च्या बनावट नोटा दुकानदाराला दिल्या. पुन्हा काही दिवसाने तो इसम परत त्यांच्या दुकानात आला व त्याने 3 किलो पीठ खरेदी केले यावेळी 100 रुपयाच्या दोन नोटा दुकानदाराला दिल्या. त्या नोटा सुद्धा बनावट दिसून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती खांदेश्‍वर पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांनी सदर इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version