मोफत रेशनच्या आमिषातून फसवणूक

| पनवेल । वार्ताहर ।

दोन अनोळखी इसमांनी एका 62 वर्षीय वृद्ध महिलेला मोफत रेशन मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून तिच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन असा 75 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. राजूबाई म्हात्रे (62, रा.धाकटा खांदा, पनवेल) असे या महिलेचे नाव असून त्या कर्नाळा सर्कल येथील रिक्षा स्टँण्डजवळून रुपाली टॉकीजकडे जाणार्‍या रस्त्यावरील येशीबाई मंदिरासमोर हा प्रकार घडला आहे. यावेळी दोन अनोळखी इसमांनी मोफत रेशन मिळवून देतो, असे सांगून बोलण्याचा बहाणा करत रोख रक्कम व सोन्याची चेन चोरून नेली आहे.

Exit mobile version