। पनवेल । वार्ताहर ।
कामोठेमधील तरुणाला इंडियन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून 7 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी संदीप भांगरे याच्याविरोधात कामोठे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
कामोठेमध्ये राहणारे विशाल पवार यांनी तक्रार दिली आहे. विशालची डिसेंबर 2020 मध्ये संदीप भांगरे याच्यासोबत ओळख झाली. तुमच्या भावाला नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखविले. त्याच्यावर भरवसा ठेवून डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान पैसे दिले. लॉकडाऊननंतर फोन बंद केला. विशाल यांनी भांगरे याच्या मावळ तालुक्यातील गावी जाऊन चौकशी केली असता त्याने यापूर्वी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली असल्याचे समजले. फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच विशाल याने तक्रार दिली आहे.