| चेन्नई | वृत्तसंस्था |
मंदौस चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा बसला आहे. चेन्नईच्या किनारपट्टीवर चक्रीवादळानं तांडव घातले. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. चेन्नईमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे 115 मिमी पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. 89 जनावरांचा मृत्यू झाला तर यामुळे 151 घरांचं नुकसान झाले असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
महाराष्ट्रात पाऊस
दरम्यान, मंदौसचा परिणाम महाराष्ट्रातही चांगलाच जाणवला. नांदेड, परभणी, अमरावती, पुणे आदी जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस पडला. यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले. हवामानातही बदल झाल्याचे दिसून आले.