पर्यटक पहिल्या दिवशी देणार रायगड किल्ल्याला भेट
| रायगड | प्रतिनिधी |
भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत सोमवार (दि.9) पासून सुरू होत असून, पर्यटक पहिल्या दिवशी रायगड किल्ला येथे भेट देणार आहेत. विशेष म्हणजे तिथीनुसार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याची संधी या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना मिळणार आहे.
5 दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. ही विशेष रेल्वेचे सोमवारी सकाळी 10.30 वा माणगाव रेल्वे स्थानक येथे आगमन होणार आहे. सर्व प्रवासी रायगड किल्ले येथे भेट देणार आहेत. सायंकाळी 5 वा रेल्वेने पुणेकडे प्रयाण करणार आहेत.
यात्रेचा प्रवासमार्ग
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.
प्रमुख स्थळांची माहिती
रायगड किल्ला, लाल महाल, कसबा गणपती व शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर,
पन्हाळा किल्ला