कोप्रोली येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबीर

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यात महसूल व वनविभागाच्या वतीने महसूल विभागाशी संबंधित असलेल्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काही प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. कोप्रोली येथील आई एकवीरा हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे अध्यक्षस्थान उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी भूषविले होते. यावेळी शिबिरात तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी उरण तालुक्यातील महसूल विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले व नवीन योजना तसेच शासन निर्णयाबाबतची माहिती उपस्थित जनसमुदायास दिली.

या कार्यक्रमात एकूण 90 लाभार्थ्यांना सातबारा उतारे, 42 लाभार्थींना 8अ च्या उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. यात 22 फेरफार निकाली व 12 सातबारा दुरुस्तीसह 15 लाभार्थ्यांना संजय गांधी योजना प्रमाणपत्रे, 30 लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याचे वाटप, 14 लाभार्थ्यांची ॲग्री स्टॅग नोंदणी करण्यात आली. यावेळी मनोहर म्हात्रे यांनी उपस्थित जनसमुदायास आपत्कालीन परिस्थिती व प्रथमोपचाराबाबतचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास तहसीलदार डॉ. उद्धव कदम, नायब तहसीलदार रवींद्र सानप, नायब तहसीलदार नरेश पेडवी, तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक समन्वय अधिकारी मनोहर म्हात्रे, राजिपचे सदस्य अविनाश ठाकुर, उरण पंचायत समितीच्या सदस्या सविता पाटील, माजी सभापती विश्वास म्हात्रे, राजिपचे माजी सदस्य जीवन गावंड, राजिपचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर, मंडळ अधिकारी के डी मोहिते, कोप्रोली ग्राम महसूल अधिकारी, भाऊ पिरकर, जयहिंद कोळी, संभाजी खुस्पे, सुभाष पवार, निखिल वाइंगडे, अमोल बोराटे व महसूल सेवक नथुराम कातकरी, आदेश गावंड, नंदिनी यांच्यासह मदतनीस कार्यक्रमास उपस्थित होते.

Exit mobile version