बाल संगोपन मार्गदर्शन कार्यशाळा

| माणगाव । वार्ताहर ।
लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शुक्रवार (दि.21) साई येथे बालसंगोपन मार्गदर्शन आरंभ कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत शून्य ते तीन वर्षे वयाच्या बालकांचे आरोग्य मेंदू वाढ व विकास, नातेवाईकांनी संगोपणात घ्यावयाची काळजी, विविध प्रकारच्या खेळांचे महत्त्व याबाबत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. सीमा ठाकरे यांनी या प्रशिक्षणात उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले.बालविकासाची संकल्पना वाढ व विकासासाठी आरंभ बालसंगोपन मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात अंगणवाडी सेविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रशिक्षण घेतले. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, लाजवंती मोरे, सुजाता शिगवण तसेच अंगणवाडी सेविका या कार्यशाळेत उपस्थित होत्या.

Exit mobile version