। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई येथे शाळा पूर्व तयारी अभियानातंर्गत बाल मेळाव्याचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरी काढून करण्यात आली. ढोल ताशा व लेझिम विविध घोषणा देत विविध वेशभूषा करून विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी ताई, मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवर व पहिलीत दाखल होणार्या विद्यार्थी व पालकांचे ही गुलाबपुष्प, चॉकलेट व मुलांना बर्थडे कॅप देऊन त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
बालमेळाव्याच्या माध्यमातून मुलांसोबत आई-वडील देखील आपल्या मुलातील आकलन क्षमता, बौद्धिक क्षमता ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील असे मत बर्याच माता-पालकांनी व्यक्त केले आणि या शैक्षणिक उपक्रमाचे पालकांसह सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी ललिता पाटील, सरपंच मोठीजुई पुरुषोत्तम भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तृप्ती बंडा, उपाध्यक्षा मुकेश महाजन व गुरुनाथ ठोंबरे आदी मान्यवरांनी सहभाग घेऊन शोभा वाढवली.
मोठीजुई शाळेत बाल मेळावा
