। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई या शाळेत सुयोग्य आहार काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी व त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी एक अनोखा आगळावेगळा उपक्रम सकस आहार याचे प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती महिला बचत गट पालकवर्ग व अंगणवाडी ताई तसेच शिक्षकवर्गाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रदर्शनामध्ये घरी बनवलेले वेगवेगळे पदार्थ एकत्र करुन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेचे उपक्रमशिल शिक्षक संजय होळकर, दर्शन पाटील, संदीप गावंड, शर्मिला भोईर, यतीन म्हात्रे व ज्योती बामणकर यांनी विशेष मेहनत घेवून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक संजय होळकर यांनी मानून प्रदर्शनाची सांगता केली.