चिंतामणराव केळकर विद्यालयाचा 12 व्या वर्षी शंभर टक्के निकाल

। अलिबाग । प्रतिनिधी।

अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेत सलग 12 व्या वर्षीही चिंतामणराव केळकर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्वरा अविनाश पाटील हिने 97.60 गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचे मराठी माध्यमाचे 20 विद्यार्थी, सेमी इंग्रजी माध्यमाचे 48 विद्यार्थी तर इंग्रजी माध्यमाचे 53 विद्यार्थी असे एकूण 121 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 8 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. 44 विद्यार्थीना 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. 34 विद्यार्थी 70 टक्के पेक्षा जास्त तर. 27 विद्यार्थी 60 गुण मिळवून उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमात आर्या संदेश आठवले हेने 85 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. सेमी इंग्रजी माध्यमामध्ये मयुरेश शैलेश पाटील शाळेत पहिला आला. त्याने 93 टक्के गुण मिळवले. इंग्रजी माध्यमध्ये स्वरा अविनाश पाटील हिने 97.60 गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

Exit mobile version