। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आंदोशी येथील जगन्नाथ बाळू चेरकर यांचे मंगळवारी अल्पशा आजारामुळे निधन झाले. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी (दि.26) चेरकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
यावेळी प्रकाश खडपे, निनाद वारगे आदी शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व चेरकर कुटुंबिय उपस्थित होते. जगन्नाथ चेरकर यांनी गेली अनेक वर्षे देना बँकेत सेवा केली होती. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर शेती व कृषी व्यवसायाकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. शेती करीत असताना दुधाचा व्यवसायदेखील चालू ठेवला होता. सामाजिक क्षेत्रातदेखील ते सक्रीय होते. तसेच वारकरी भजनांमध्येही त्यांना आवड होती. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. चेरकर यांचे मंगळवारी (दि.17) अल्पशा आजारामुळे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुली, मुलगा, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
जगन्नाथ चेरकर यांच्या निधनाची माहिती मिळताच शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी आंदोशी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन चेरकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.