चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन

| मापगाव | प्रतिनिधी |

विजय थळे यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या व राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी मापगाव येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील थळे यांच्या घरी भेट देऊन थळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सुनील थळे व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत दुःखात सहभागी होत धीर दिला. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अनिल गोमा पाटील, अशोक नाईक, दीपक पाटील, माजिद कुर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version