। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळकृष्ण गौरू गायकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी गायकर कुटूंबियांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सांत्वन केले.
यावेळी शेकापचे सुनील थळे, भाई थळे, माजी सरपंच कृष्णा भोपी, मोहन धुमाळ, संदेश वारगे, महेश झावरे, निनाद वारगे, अजिंक्य मढवी यांच्यासह मंगेश गायकर, हरेश गायकर, सुना, नातवंडे उपस्थित होते.
बेलोशी गावासह पंचक्रोशीत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घराघरात पोहचविण्याचे काम बाळकृष्ण गायकर यांनी केले. एक निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते होते. राजकिय क्षेत्राबरोबरच त्यांना अध्यात्माची गोडी होती. सदभक्ती प्रसारक भजन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य होते. गायकर आप्पा म्हणून ते परिचित होते. बाळकृष्ण गायकर यांचे शुक्रवारी (दि.09) निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांनी बेलोशी येथील त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियाची विचारपूस करीत सांत्वन केले.