| अलिबाग | वार्ताहर |
आपल्या आमदारांनी जनतेशी गद्दारी केली आहे. राज्याची तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. 50 खोके घेऊन गुजरातमार्गे गुवाहाटीला जाऊन महाराष्ट्राच्या जनतेची बदनामी केली आहे. अशा गद्दारी करणार्या आमदारांची घमंड व मस्ती आपण सर्वांनी मिळून उतरवायची आहे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले. बुधवारी (दि. 13) मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौर्यादरम्यान धोकवडे येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, मागील कोरोना काळात विरोधक घरात बसून असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी तळागाळातील समाजासाठी केलेले अविश्रांत कार्य, माजी आमदार मधुकर ठाकूर यांची सर्वसामान्य जनतेविषयी असलेली तळमळ व त्यांनी दाखवलेली माणुसकी मी जवळून पाहिली आहे. या प्रचार सभेत ज्येष्ठ शेकाप नेते शंकरराव (आप्पा) म्हात्रे, धोकवडे सरपंच गुरुप्रसाद म्हात्रे, उपसरपंच सचिन म्हात्रे, सासवणे सरपंच संतोष गावंड, माजी पंचायत समिती सदस्य नेहा सचिन म्हात्रे, सासवणे ग्रामपंचायत सदस्य सुशील पाटील, सदस्या नैना शिलदणकर, धोकवडे ग्रामपंचायत सदस्य शेखर काकडे, माजी पंचायत समिती सदस्य विजय पेढवी, अलिबाग तालुका काँग्रेस पक्षाचे युवा सरचिटणीस शिवप्रसाद तोडणकर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मापगाव विभाग प्रमुख सुबोध राऊत, शिवसेना(उद्धव ठाकरे गट) माजी उपतालुका प्रमुख सुरेश घरत, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मिळकतखार शाखा प्रमुख रोहिदास जामले, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मापगाव विभाग उपविभाग प्रमुख नितेश कडू, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अलिबाग महिला आघाडी प्रमुख स्नेहल साखरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मापगाव जि.प. मतदारसंघातील पहिली प्रचारसभा किहीम येथे किहीम उपसरपंच मिलिंद पडवळ यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी किहीम ग्रामपंचायत हद्दीतील शेकाप कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुसरी प्रचारसभा मुनवली येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत यांच्या निवासस्थानी पार पडली. या प्रचारसभेत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते काका ठाकूर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आमिर उर्फ पिंट्या ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मजीद कुर, जगन्नाथ पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोगाव येथील मुस्लिम समाजातील महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर धोकवडे येथील प्रचारसभा झाल्यानंतर सासवणे येथील ज्ञानेश्वर मंदिर कोळीवाडा येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी कोळी बांधवांनी सांगितले की, आमच्या कोळी बांधवांसोबत शेकापच्या सर्व नेत्यांचे घनिष्ठ नाते आहे, आमच्या प्रत्येक अडीअडचणी वेळी जयंतभाई, पंडितशेठ धावून येतात, त्यामुळे आमचा पूर्णपणे पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. या सभेत सासवणे ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री नाखवा, सदस्य विश्वास थळे, माजी सदस्य अशोक म्हात्रे यांच्या सह सासवणे कोळीवाडा व त्या भागातील महाविकास आघाडीचे महिला व पुरुष कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तद्नंतर चित्रलेखा पाटील यांनी कोळगाव येथे मंदिरात जाऊन दर्शन घेत उपस्थित ग्रामस्थांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी लहान मुलांनी शिट्टी वाजवत ताईंचे स्वागत केले. तसेच बोडणी येथील समाज मंदिराच्या आवारात असलेल्या साईबाबांच्या मंदिरात आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन प्रचारसभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोडणी, रेवस, कोप्रोली, मिळकतखार परिसरातील कोळी महिला, पुरुष मंडळी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थित लक्षणीय होती. उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी संवाद साधताना उपस्थित महिलांनी पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्याची मागणी केली, तेव्हा उद्यापासून पुढील काही दिवस पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला जाईल असे सांगितले असता कोळी महिलांनी पाणी टँकरद्वारे नको तर नळाद्वारे एमआयडीसीचा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावर चित्रलेखाताई यांनी योग्य नियोजन होईपर्यंत माझ्या वैयक्तिक खर्चाने टँकरने एमआयडीसीचाच पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी उपस्थित कोळी महिलांनी जल्लोष करत आम्ही सर्व महिला आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले. या बोडणीच्या सभेत मल्हारी मार्तंड चेयरमन विश्वास नाखवा, व्हाईस चेयरमन रोशन नाखवा, सोसायटीचे सदस्य दत्तगुरु नाखवा, माजी बोडणी सरपंच तुळशीराम नाखवा, रवी नाखवा, बाळनाथ नाखवा, हरिश्चंद्र नाखवा, बळीराम पेरेकर, विवेक पेरेकर, बजरंग नाखवा, भगवान ससकर, तुळशीराम दत्तू, रामा नाखवा यांच्यासह पंचक्रोशीतील महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व महिला व पुरुष मतदार तसेच रेवस-बोडणी नाखवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी बोडणी येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा मारुती नाखवा यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली, यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तसेच आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले.
आगरसुरे येथील प्रचार सभेत गद्दार आमदारांनी केलेल्या कृत्याचा महाराष्ट्राची जनता बदला घेण्यासाठी सज्ज झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी प्रचार करून मला 3 नंबरच्या शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मापगाव विभाग प्रमुख सुबोध राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अलिबाग तालुका प्रवक्ते धनंजय गुरव, सुनील म्हात्रे, शिल्पा घरत, स्नेहल देवळेकर, नंदकुमार पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, सुनिल पाटील, विजय पेढवी, अजित मालूष्टे, महेश मालूष्टे, समीर राऊळ, राजेंद्र म्हात्रे, संतोष म्हात्रे, जयवंत साळुंखे, प्रकाश थळे, प्रविण घरत, भरत खळगे व पंचक्रोशीतील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मापगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक सभेच्या ठिकाणी चित्रलेखा पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एकंदरीतच उच्चशिक्षित असल्याने त्यांना प्रत्येक ठिकाणी मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या उमेदवारीमुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
मतदारांचा वाढता पाठिंबा
चित्रलेखाताई पाटील यांनी महिला सक्षमीकरण, शालेय मुलींना सायकल वाटप, हळदीकुंकू कार्यक्रम, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे आदी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, आपला विजय हा नक्की आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. एकंदरीतच, चित्रलेखा पाटील यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.