रेवदंड्यात चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे आता शक्य नाही. यामुळे उमेदवारांनी प्रचार फेर्‍यांचा धडाका लावला आहे. अलिबाग-मुरूड आणि रोहा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराचा शुभारंभ रेवदंड्यातील मारुती मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 09) सकाळी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे. उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील बहुतांश उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसभर प्रचार फेर्‍या आणि रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या जात आहेत.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस चौल विभागीय अध्यक्ष अशोक आंबुकर, शेकापचे रेवदंडा मा. सरपंच सदाशिव मोरे, सोनाली मोरे, संतोष मोरे, राजेंद्र वाडकर, सुरेश खोत, निलेश खोत, राजेंद्र चुनेकर, हेमंत गणपत, प्रमोद नवखारकर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख मारुती भगत, चौल उपसरपंच अजित गुरव, जयवंत ठोंबरे, काँग्रेसचे विभागीय खजिनदार सुगम आंबुकर, आशिष गोंधळी, गोंधळी, नवाब तांडेल, संगीता महिमकर, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version