पाणी जपून वापरण्याचे सिडकोतर्फे आवाहन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, दि. 05 रोजी सकाळी 09.00 वाजेपासून ते शनिवार, दि. 06 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version