सिडकोची टपरीधारकांवर कारवाई; ट्रकखाली झोपलेल्या इसमाचा मृत्यू

। जेएनपीटी । वार्ताहर ।
सिडकोच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (11 नोव्हेंबर ) उरण चार फाटा व द्रोणागिरी नोड येथील सेक्टर 50 ते 52 मधिल अनधिकृत टपरीधारकांवर वर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्री शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडकोच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या अचानक कारवाईने दुकानातील सामान काढून घेताना मालकांची एकच तारांबळ उडाली. कारवाई प्रसंगी ट्रक खाली झोपलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला आहे. कारवाई प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडकोच्या अतिक्रमण विभागाने अचानक केलेल्या कारवाईमुळे दुकानातील, टपरी मधिल सामान काढून घेताना एकच तारांबळ उडाली होती. रहदारीच्या रस्त्यावर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढली आहेत, त्यामुळे उरण मध्ये वाहतूक कोंडी बरोबर पादचारी वर्गाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार सुचना देऊन ही अतिक्रमणे वाढत आहेत. वाढणारी अतिक्रमणे काढून टाकण्याचे काम सध्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतले असल्याचे सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी शेख यांनी सांगितले.

Exit mobile version