| कोर्लई | वार्ताहर |
रायगड जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण – रायगड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड मधील क्षत्रिय माळी समाजाच्या हॉलमध्ये नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन नायब तहसीलदार रवींद्र सानप यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नागरी संरक्षण विभागाचे सहाय्यक उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे, शशिकांत शिरसाठ, नायब तहसीलदार रवींद्र सानप, ड.के.डी.पाटील, ड.भुपेंद्र पाटील, वाहतूक पोलीस किशोर बटाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुरुड) प्राचार्य इस्तियाक घलटे, अंजुमन इस्लाम हायस्कूलचे प्राचार्य जाहीद गोठेकर,धनसे,उदय सबनीस, समन्वयक तुफैल दामाद तसेच सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालयीन व तांत्रिक महाविद्यालयाचे विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.