जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

प्रभाग क्रमांक 18 मधील परदेशी आळी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण काम व इमारत पुनर्विकासची कामे चालू आहेत. सदरच्या कामांची डॉ. सुरेखा मोहोकर वारंवार स्वतः उभे राहून पाहणी करीत असतात व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करीत असतात. इमारत पुनर्विकास करणार्‍या विकासकाने संपूर्ण गटार माती टाकून बंद केले होते. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास प्रतिबंध होत असल्याची तक्रार तसेच राडारोडा पडलेला असल्यामुळेदेखील नागरिकांना याचा त्रास होत होता. रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर पाण्यासाठी केलेली वाटदेखील तशीच राहिल्यामुळे नागरिकांचे होणारे अपघात अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी बुधवारी स्वतः जातीने हजर राहून रस्ते इंजिनिअर ऋषिकेश, अमित ठाकूर, प्रभाग अधिकारी माळी यांच्याकडे पाठपुरावा करत जेसीबीने सर्व सफाई करून घेतली.

तसेच स्वतः पुनर्विकासक यांच्याशी फोनवर बोलून जेसीबीचे सहकार्य रस्ते ठेकेदाराकडून घेऊन नाले उघडून घेतले आहेत व आपणास जर सामानाची वाहतूक करायची असेल, तर आपण पाण्याचा निचरा योग्य करण्यासाठी पाइप टाकून घ्यावेत, अशा सूचना केल्या. रस्ते ठेकेदार यांनी संपूर्ण राडारोडा उचलून गटार पाणी निचरा करून दिला व सर्व तक्रारींचे निवारण करून घेतले. यावेळेस ठेकेदार यांचे जे.इ., पुनर्विकासक यांचे कर्मचारी मंदार खामकर, जयवंत भोईर, मनीषा परदेशी, मोहनसिंग परदेशी, श्री. पाटील व इतर नागरिक उपस्थित होते. याबदल नागरिकांनी डॉ. सुरेखा मोहोकर या नेहमीच स्वतः उभे राहून आमच्या समस्या जाणून घेऊन निराकरण करतात याबद्दल आनंद व्यक्त केला.

Exit mobile version