भाजप नेत्यांच्या स्वागतासाठी पायघड्या; सफाई कर्मचार्‍यांची सुरक्षा वार्‍यावर

| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल मनपाच्या क्षेत्रात शनिवारी भाजपच प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून, महाराष्ट्रातील भाजपचे सर्व बडे नेते पनवेलमध्ये येणार आहेत. त्यामुळे या नेत्यांना काम दाखविण्याकरिता अखेर पनवेल महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली पायघड्या घालण्यात येत आहेत. कधी नव्हे ती अनेक परिसरातील साफसफाई होत असल्याने पनवलेकर नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून पनवेल मनपा क्षेत्रात घाणीच साम्राज्य होते. मात्र, ही घाण कधीच साफ करण्यात आली नव्हती. मात्र, आज अचानकपणे साफसफाई सुरुवात केल्यामुळे पनवेलकर नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असून, समाधानही व्यक्त होत आहे.

सायन-पनवेल महामार्गा शेजारी वर्षोनुवर्षे पडलेला कचरा आता पालिकेचे अधिकारी उचलत आहेत. प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या एक दिवस आधी जेसीबी आणि डंपरद्वारे ही साफसफाई करण्यात येत आहे. मात्र, ही साफसफाई करताना सफाई कर्मचार्‍यांच्या हातात ना हॅन्डग्लोज आहेत, ना गम बूट आहेत. सफाई कर्मचार्‍यांची सुरक्षा वार्‍यावर सोडत, त्यांच्या जीवाशी खेळणार्‍या महापालिकेविराधात संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version