। महाड । वार्ताहर ।
शहरातील पूरस्थिती ओसरल्यानंतर महाड नगरपालिकेने अल्पावधीतच महाड शहराची स्वच्छता केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने शहरांमध्ये सावित्री व गांधारी नद्यांना पूर आले. पुराचे पाणी सुमारे दहा ते बारा तास शहरांमध्ये साचून राहिले होते. शहरातील बाजारपेठेचा काही भाग, सुकट गल्ली परिसर, भोईघाट, भीमनगर, दस्तुरी नाका परिसरात पाण्यासोबत आलेला कचरा व शहरातील साफसफाई नगरपालिका सफाई कामगारांनी तातडीने हाती घेतली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व स्वच्छता विभाग प्रमुख परेश साळवी यांनी योग्य नियोजन करून कचरा हटवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम बाजारपेठ व सुकट गल्ली येथे साफसफाई करण्यात आली.
पुरानंतर महाड शहराची साफसफाई
