कपड्यांच्या दुकानाला मोहोपाड्यात आग

रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील रविंद्र यशवंत गायकवाड यांच्या कपड्यांचा दुकानाला बुधवारी पहाटे अचानक आग लागून दुकानातील कपड्यांसह इतर सामान असे अंदाजे एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा माल आगीत जळून भस्मसात झाला असून कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत राहणारे रविंद्र यशवंत गायकवाड हे पहाटे पाच वाजता गाढ झोपेत असताना त्यांचा फोन खणाणला. यावेळी त्यांच्या ओम मानसी लेडिज कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून धुर बाहेर पडत असल्याचे रस्त्यावरुन जाणा-या नागरिकांनी सांगितले.यावेळी रविंद्र गायकवाड आपल्या दुकानासमोर आले.आग आटोक्यात आणण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी मदत केली.यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.हि आग दुकानात शार्टंसर्किट होऊन लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.यावेळी दुकानातील आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील किमती कपडे, फर्निचर, सिलिंग, फॅन, रोख 27 हजार रुपये, कपड्यांची बिले असे अंदाजे एकूण 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल आगीत जळून भस्मसात झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version