वन्यजीव सप्ताहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

। मुंबई । प्रतिनिधी ।
वन्यजीव सप्ताह 2021चे उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील वन्यजीव ‘वाईल्ड महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधानसचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जी साईप्रकाश यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि वन्यजीवप्रेमी उपस्थित होते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

Exit mobile version