पनवेलमध्ये दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

। पनवेल । वार्ताहर ।
सध्याच्या महाराष्ट्रासह देशभरात होत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सर्तकता म्हणून पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने वावंजे या ठिकाणी जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम केली.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावंजे याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. या योजनेच्या रंगीत तालमीत दोन पोलीस निरीक्षक, एक सपोनि, दोन पोउपनि, 15 पोलीस अंमलदार, तसेच तळोजा एमआयडीसीकडील अग्निशमन दलाचे एक अधिकारी व पाच फायरमॅन टेंडर व्हेन व अ‍ॅम्ब्युलन्स असे हजर होते.

Exit mobile version