। पनवेल । वार्ताहर ।
थंडीच्या मोसमामध्ये पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी पार्टी करणे ही परंपरा आहे. याची अनेकांना भुरळ पडली असून अनेक ठिकाणच्या फार्म हाऊस आणि शेतामध्ये या पोपटी पार्ट्या होत असतात. अशाच प्रकारे पेण येथे सुद्धा हास्य जत्रेतील कलाकारांची नुकतीच पोपटी पार्टी संपन्न झाली.
पोपटीची भुरळ हि सर्वसामान्यांन बरोबरच देश विदेशात हास्य सम्राट असलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकारांना सुद्धा लागली असून पोपटीची चव चाखण्यासाठी हे रतिमहारथी पेण येथील नंदू कल्याणकर यांच्या फार्महाऊसवर अवतरले होते. थंडीची चाहूल लागल्याने आता रायगड परिसरात थंडीने हिटची जागा थंडाव्याने घेतली आहे. हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात पोपटी हा प्रकार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अश्या या पोपटीच्या हास्य जत्रेतील अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेता पॅडी कांबळे, संगीतकार अमीर हडकर, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, लेखक विनायक पुरुषोत्तम, गीतकार मंदार चोळकर, निखिल बने, वादक किशोर मोहिते, सुनील जाधव, श्याम बांगर, साहिल रेळेकर, आशिष महाडिक, गायिका मोनल कडलक, पोपटी शेफ प्रशांत शेडगे, दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे, वर्षा हडकर, कस्तुरी रेळेकर तसेच कल्याणकर कुटुंबिय हे त्यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित कलाकारांनी पोपटीचा आनंद लुटला तसेच पुन्हा एकदा नक्कीच येवू असा वादा सुद्धा केला.
कुटुंब, पाहुणे, मित्र-मंडळी, कट्ट्यावरचे सोबती ते अगदी कार्यालयातील सहकारी अशा सर्वांना बोलावून पोपटी पार्ट्यांचे आयोजन होते. कारण पोपटी लावल्यानंतर ती शिजेपर्यंत किमान अर्धा ते पाऊणतास वाट पाहावी लागते. मग त्यादरम्यान रंगतात धम्माल गप्पा, जुन्या आठवणी किंवा छोटेखानी, घरगुती गाण्यांच्या मैफली जमल्यावर त्या सारखा दुसर स्वर्गीय सुख नक्कीच नाही. – विशाखा सुभेदार ,अभिनेत्री