। माणगाव । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. शनिवारी (दि. 28) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास इंदापूरनजीक वावे दिवाळी येथे दुचाकीला इनोव्हा कारची धडक लागली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकार लिहलेली इनोव्हा कार व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. रोहा तालुक्यातील महादेव वाडी येथील राजाराम अनंत धारदेवकर (64), हे टिव्हीएस ज्युपिटरवरून रोहा येथून माणगावच्या दिशेने जात होते. दरम्यान मुंबईच्या दिशेने माणगावकडे जाणाऱ्या इनोव्हा गाडीने इंदापूरनजीक वावेदिवाळी येथे दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती की यात राजाराम धारदेवकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.