कोकण पुर्नबांधणी दौर्‍याला सुरूवात

। पेण । वार्ताहर ।
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.मनोज आखरे यांनी कोकण पुर्नबांधणी दौर्‍यानिमित्त दुर्गदुर्गेश्‍वर किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधिस, मेघडंबरी व होळीच्या माळावरील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले व कोकणाची मजबूत बांधणी करण्याचे जाहीर केले. तसेच शिवाजी महाराज समाधी विटंबना प्रकरणी सर्व शिवप्रेमिंच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून फरार असणार्‍या पाचव्या आरोपीस जो या गुन्ह्यात प्रमुख मास्टरमाईड आहे त्यास लवकरात लवकर अटक करावी अशी महाड रायगड पेालीस स्टेशनचे पी.आय.देशमुख यांच्याशी चर्चा करून मागणी केली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुहास राणे, मार्गदर्शक स्वप्निल म्हात्रे, प्रशांत दरेकर, निलेश माळवी, भूषण सिसोदे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रेवती कदम, मोरेश्‍वर भोईर, सुजित भगत, पृथ्वीराज खाडे, तालुका अध्यक्ष परमानंद जांभळे, जितेश पाटील, चेतन मुंडकर व अन्य संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version