। जेएनपीटी । वार्ताहर ।
जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड ज्योती म्हात्रे (68) याचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्योती म्हात्रे या फुंडे ग्रामपंचायतीच्या दोन वेळा सरपंच होत्या. रायगड जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या त्या सदस्या होत्या. महिला संघानेच्या वतीने गेली अनेक वर्षे बोकडविरा येथील कामगार भवनात कौटुंबिक वादविवाद मिटविण्यासाठी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना बसवून त्यांचे संसार पुन्हा उभे करण्याचे काम त्या करीत होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव प्राची हतीवलीकर, उपाध्यक्ष हेमलता पाटील, मुंबईच्या सुगंधी फ्रान्सिस, रायगड जिल्हा सचिव अमिता ठाकूर, तारा ठाकूर, कुसुम ठाकूर, निरा पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांचे निधन
