। कोर्लई । वार्ताहर ।
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडात शोकसभा होणार आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.20) दुपारी 4 वाजता दादासाहेब साबळे महाविद्यालय माणगांव, दुपारी 4 वाजता रॉयल गार्डन हॉटेल कर्जत, रविवारी (दि.21) सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरीक सभागृह रोहा, संध्याकाळी 5 वाजता विठ्ठल मंदिर (धाकटी पंढरी) ताकई, साजगाव खालापूर अशा ठिकाणी ह्या शोकसभांचे नियोजन करण्यात आलेले आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत यांनी दिली आहे.