। उरण । वार्ताहर ।
उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांचे पुत्र सर्वेश नरेंद्र गाडे (37) यांचे अल्पशा आजाराने परदेशी निधन झाले. गटविकास अधिकारी नीलम गाडे यांचे सुपुत्र सर्वेश गाडे हे फिलिफाईन्स येथे नोकरीसाठी वास्तव्य करून होते. त्यांच्यावर परदेशातील रुग्णालयात आजारावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच सर्वेश यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व बहीण असा परिवार आहे.