अॅड.कैलास मोरे यांची मागणी
। कर्जत । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यानी फी न भरल्यामुळे एस.एस.सीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्या नेरळ येथील एलएइएस शाळेवर कारवाई करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अॅड.कैलास मोरे यांनी केली आहे.
शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासकीय आदेशानुसार स्प्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्याने शाळेची फी भरली नाही म्हणुन शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परिक्षेस बसण्यास प्रतिबंध करू शकत नाही. तसेच अशा विद्यार्थ्यांचा निकाल सुद्धा रोखून ठेवु शकत नाही. असा शासनाचा आदेश असताना सुद्धा नेरळ येथील एलएइएस शाळेने शेकडो विद्यार्थ्यांना फि भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. एलएइएस शाळा जर शिक्षणासंदर्भातील प्रचलित कायदे तसेच शासन आदेशाला जुमानत नसेल तर त्यांची मान्यता रद्द करा तसेच योग्य ती कडक कारवाई त्यांच्यावर करावी अशी मागणी गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना निवेदनामार्फत करण्यात आली. तसेच यावेळेस अधिकार्यांना इशारा सुद्धा देण्यात आला की, आपल्याकडून आमच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यास आम्हाला आपल्याविरूद्ध विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तिव्र स्वरूपाचे आंदोलन आम्हाला छेडावे लागेल.
याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अफड कैलास मोरे, हरिश्चंद्र यादव, अनिल गवळे, धर्मेंद्र मोरे, सुनिल सोनावणे, संतोष जाधव, अशोक कदम, लोकेश यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.