। अलिबाग । प्रतिनिधी ।
नवगांवमधील सामाजिक कार्यकर्ते बळवंत शंकर कवळे (74) यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे निधन झाले. शेकाप नेते माजी आ. जयंत पाटील यांनी बुधवारी नवगाव येथे जाऊन कवळे कुटूंबियांची भेट घेतली. विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, माजी उपसरपंच फिडी कटोर, श्रीरंग कटोर, विद्यमान उपसरपंच निखील कवळे, सुरेंद्र कटोर, अरुण कवळे, नरेंद्र थळकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व कवळे कुटूंबिय उपस्थित होते. बळवंत कवळे हे डोंबीवली येथे नोकरीला होते. काही वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. ते सामाजिक क्षेत्रात सक्रीय होते. सोमवारी (दि.9) सप्टेंबरला त्यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. नवगांवमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकिय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. नवगांवचे उपसरपंच तथा शेकाप कार्यकर्ते निखील कवळे यांचे ते काका होते. बळवंत कवळे यांचा उत्तरकार्य शुक्रवारी (दि.20) सप्टेंबरला त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कवळे कुटूंबियांनी दिली.