चित्रलेखा पाटील यांनी केले कौतुक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेझारी तथा आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल आदर्श शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी तनिष्का विनोद पाटील ही अलिबाग तालुक्यातून एकमेव शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी ठरली आहे. तनिष्काच्या यशाबद्दल शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विनोद पाटील व तनिष्का पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.