आ. जयंत पाटील यांच्याकडून फडके कुटुंबियांचे सांत्वन

| उरण | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील नेरे येथील सामाजिक कार्यकर्ते, पैलवान उस्ताद, उत्तम संगीत शिक्षक, आदर्श सरपंच म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले रमेशबुवा भागा फडके यांचे शनिवार, दि 24 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे बातमी समजताच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी फडके यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, रमेशबुवा फडके यांच्या पत्नी नंदा फडके, भाऊ चंद्रकांत फडके, मुले योगेश, हरेश, ॠषिकेश, मुलगी जागृती पाटील आदी कुटुंबियांचे आ. पाटील यांनी सांत्वन केले. स्व. रमेशबुवा फडके यांचा दशक्रिया विधी (दहावा) सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र नाशिक येथे, तर उत्तरकार्य (तेराव) शुक्रवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घरी नेरे येथे होणार आहे.

Exit mobile version