| महाड | प्रतिनिधी |
जागतिक औषधनिर्माण (फार्मास्युटिकल), पीक संरक्षण (क्रॉप प्रोटेक्शन) आणि विशेष रसायन क्षेत्रातील अग्रगण्य भागीदार हिकल लिमिटेडला इकोव्हॅडिस गोल्ड मेडल रेटिंग प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानासह कंपनी इकोव्हॅडिसकडून दरवर्षी जागतिक स्तरावर मूल्यांकन केल्या जाणाऱ्या 1,75,000 हून अधिक कंपन्यांपैकी अव्वल 5 टक्के कंपन्यांमध्ये स्थान मिळवणारी कंपनी ठरली आहे.
इकोव्हॅडिसच्या मूल्यांकनात हिकलने 84/100 गुण मिळवत 97 व्या पर्सेंटाइलमध्ये स्थान मिळवले आहे. कंपनी 85/100 गुणांच्या प्लॅटिनम मेडलच्या निकषापासून केवळ एका गुणाने मागे राहिली असून, पुढील मूल्यांकन चक्रात हा टप्पा गाठण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. इकोव्हॅडिस ही व्यवसायांच्या शाश्वतता (सस्टेनेबिलिटी) कामगिरीचे मूल्यांकन करणारी जगातील सर्वात मोठी संस्था असून, ती 185 हून अधिक देशांतील आणि 250 पेक्षा अधिक उद्योगांतील संस्थांचे मूल्यांकन करते. हा सन्मान शाश्वत व्यावसायिक पद्धतींबाबत हिकलची सातत्यपूर्ण बांधिलकी आणि इकोव्हॅडिस मूल्यांकनातील पर्यावरण, कामगार व मानवी हक्क, नैतिकता आणि शाश्वत खरेदी या चार प्रमुख स्तंभांमध्ये कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रतीक आहे. ही रेटिंग विशेषतः जागतिक लाइफ सायन्सेस आणि विशेष रसायन पुरवठा साखळीत कार्यरत कंपन्यांसाठी महत्त्वाची आहे. कारण ग्राहक आता त्यांच्या पुरवठादारांकडून शाश्वतता, नैतिकता, कामगार धोरणे आणि जबाबदार स्रोत व्यवस्थापन या बाबतीत मोजता येण्याजोगी प्रगती अपेक्षित ठेवत आहेत.







